कोकण रोजगार हक्क आंदोलनाला मुंबईत मोठा प्रतिसाद ः कोकणातील लोकप्रतिनिधींची हजेरी

रत्नागिरी ः समृद्ध कोकण संघटनेतर्फे आज मुंबई येथील आझाद मैदानात कोकण रोजगार हक्क आंदोलन करण्यात आले. कोकणातील निकामी होणारी गावे, पर्यटन, आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय आदीबाबतच्या समस्या व कोकणातील रोजगाराचा प्रश्‍न अशा विविध मागण्यांसाठी व कोकणला आंबा, काजू, मत्स्य व पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. कोकणातील अनेक भागांतून कार्यकर्ते उपस्थित होते. कोकणातील लोकप्रतिनिधींनी देखील मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. त्यामध्ये ना. एकनाथ शिंदे, आ. नितेश राणे, आ. उदय सामंत, आ. राजन साळवी, आ. हुस्नबानू खलिफे, आ. भाई जगताप, आ. भास्कर जाधव व समृद्ध कोकणचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यांचेसह कोकणातील अन्य लोकप्रतिनिधी व विविध समित्या व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button