ऑनलाईनवरून आणखी एकाची फसवणूक, ९० हजाराला गंडा
लांजा ः आयडीबीआय बँकेतून मॅनेजर बोलतो असे सांगून एटीएम नंबर मिळवून शाहीद चिकळी याच्या खात्यातून ९० हजार रुपये काढण्याचा प्रकार नुकताच लांजा येथे घडला आहे. यातील फिर्यादी शाहीद हा मुळचा सोलापूर येथील असून तो सुट्टीनिमित्त गावी गेला होता. त्याच्या मोबाईलवर दोन दिवसांपूर्वी फोन आला व आपण आयडीबीआय बँकेचा मॅनेजर बोलत असून अकौंटच्या व्हेरीफिकेशनसाठी आपला एटीएम नंबर द्यावा अशी मागणी केली. फोनवरील माणसाच्या बोलण्याला भुलून शाहीद याने एटीएम नंबर सांगितला. मोबाईलवरील इसमाने शाहीद याच्याकडून ओटीपी नंबरही घेतला. त्यानंतर काही तासातच शाहीद याच्या खात्यातील अज्ञात इसमाने ९० हजार रुपये काढून घेतले. ऑनलाईन गंडा घालण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.