आमिषापोटी जिल्हा वासियांना फटका कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून मातृभूमीचे संचालक फरार
रत्नागिरी जिल्हा वासियांना अनेक कंपन्यांनी आमिषापोटी यापूर्वीही गंडा घातला आहे. नवीन नवीन नावे धारण करून येणाऱ्या कंपन्यांच्या आमिषांना रत्नागिरी जिल्हावासीय अजूनही बळी पडत आहेत .त्याचेच उदाहरण म्हणजे मातृभूमी कंपनी. अधिक रकमेचे अमिश दाखवून या कंपनीने जिल्ह्यातील चौदाशे ग्राहकांना गंडा घालून त्यांची दोन कोटी तीस लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार आता उघड झाला आहे. रत्नागिरीतील अरविंद मोरे यांनी या प्रकरणात प्रथम तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड झाले आहे.या कंपनीचे संचालक प्रदीप गर्क ,संजय विश्वास ,मिलिंद जाधव ,विनोद पटेल यांनी मातृभूमी कंपनी निर्माण करून त्याच्या कोकणासह अनेक भागात शाखा सुरू केल्या. गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर या कंपनीत पैसे गुंतवले परंतू कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केले व त्यांना गंडा घातला आता हे प्रकरण पोलिसांकडे आले असून पोलीस कंपनीच्या संचालकांना अटक करतील असा विश्वास पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केला आहेl.