सिटीस्कॅन मशिन सुरू करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचा पाठपुरावा
रत्नागिरी ः जिल्हा शासकीय रूग्णालयातील गेले काही महिने बंद असून त्यामुळे रूग्णांना तपासणीसाठी खाजगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. आता हे बंद असलेले सिटीस्कॅन मशिन सुरू करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सकारात्मक प्रयत्न सुरू केले आहेत. सिटीस्कॅन मशिन लवकरच रूग्णांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास डॉ. बोल्डे यांनी व्यक्त केला आहे.
आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी जिल्हा रूग्णालयाच्या भेटीत बंद पडलेल्या सिटीस्कॅन मशिनची पाहणी केली.