सामना जिंकल्याच्या आनंदात क्रिकेटप्रेमीचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू
संगमेश्वर ः अतीतटीचा सामना दूरदर्शनवर पहात असताना गणपत घडशी या क्र्रिकेटप्रेमीचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना संगमेश्वर (आंबव पोंक्षे) येथे घडली आहे.
नुकत्याच झालेल्या भारत -अफगाणिस्तान सामन्याच्यावेळी हा प्रकार घडला. शेवटच्या षटकातील रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात अखेर भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळविल्याचा अति आनंद झाल्याने हा आनंद साजरा करण्यात मग्न असलेल्या गणपत जानू घडशी (६८) या क्रिकेटरसिकाचा दुर्दैवी हृदयविराने मृत्यू ओढवला.
आंबव (पोंक्षे) गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेटचे रसिक होते. मुंबईत शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते गावीच रहात होते. सेवाभावी वृत्तीचे, परोपकारी व मनमिळावू स्वभावामुळे गावात परिचित होते. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता.