
रुग्णवाहिकेसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जैतापूर त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कायम स्वरूपी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी या मागणीसाठी या भागातील महिला सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. या भागातील रुग्णांना उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाही त्यासाठी या भागातील ग्रामस्थ अनेक वर्ष मागणी करीत आहे यासाठी रस्ता रोकोचा इशाराही देण्यात आला होता.आरोग्य विभागाने यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.परंतु त्यालाही काही महिने उलटून गेले आहेत. या मागणीसाठी बचत गटाच्या हजारो महिला अाज कलेक्टर कार्यालयावर मोर्चा घेऊन धडकल्या .दरम्यान राजापूर लांजाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी यांनी तातडीने राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्या ठिकाणी कायमस्वरूपी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन दिले .