धावत असलेल्या शिवशाहीची अवस्था नाजूक असतानाच महामंडळ नव्या ४०० शिवशाही एसी बस खरेदी करणार

रत्नागिरी ः प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात चारशे वातानुकुलीत एसी बसेस सामील करून घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय दोनशे स्लिपर कोच ताफ्यात सामील करून घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. रावते यांनी ही घोषणा केली असली तरी यापूर्वी शिवशाहीचा अनुभव जनतेला चांगला नाही. नव्याने घेतलेल्या अनेक शिवशाही बसेसचे अपघात झाले असून प्रवासी त्यातून प्रवास करण्यास तयार होत नसल्याने अनेक गावातून सुरू झालेल्या शिवशाही बसेस बंद झाल्या आहेत.
असे असताना परिवहन मंत्र्यानी नव्याने शिवशाही बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एस.टी.चा तोटा कमी करून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी २०१७-१८ पासून महामंडळाने ५०० एसी शिवशाही बसेच ताफ्यात सामील केल्या. २०१९-२० या वर्षात ४०० एसी शिवशाही बसेस त्याचबरोबर विना-वानानुकलीत आणि शयनप्रकारच्या अनुक्रमे दोनशे व सातशे नवीन बस आणण्याची योजना आखली आहे. शिवशाही बसेस खरेदी केल्यानंतरही एस.टी.चा तोटा कमी झालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button