
वेळणेश्वर येथील क्रिडापटू अजय सुर्वे याचे आकस्मिक निधन
असगोली ः गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील अजय गजानन सुर्वे या २३ वर्षीय युवकाचे मेंदूच्या आजाराने निधन झाले. अजयला काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोठा मित्रपरिवार व चांगला खेळाडू म्हणून परिचित असल्याने त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजयचे कुटुंब मुळचं रत्नागिरी मुरूगवाडा येथील होते.