बचत गटांसाठीच्या ‘प्रज्ज्वला’ चे कोकणात प्रशिक्षण कार्यक्रम
मुंबई, दि. १३ जून : महाराष्ट्र राज्य महिला आयोग राज्यातील बचत गटांसाठी राबवित असलेल्या प्रज्वला योजनेंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम दि २३ आणि २४ जून २०१९ रोजी सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी आणि गुहागर येथे होणार आहेत. या कार्यक्रमात महिलांना कायदेविषयक, आर्थिक, सामाजिक तसेच सायबर सुरक्षा आदी विषयावर ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
“राज्यामध्ये सुमारे ३ लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्ज्वला योजना आकारास आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण, दुसरया टप्प्यात ‘एक जिल्हा, एक वस्तू’ची क्लस्टर्स निर्मिती आणि तिसरया टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी बचत गट बाजारांची उभारणी असे नियोजन आहे,” अशी माहिती विजया रहाटकर यांनी दिली.
या योजनेसाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
१) सावंतवाडी प्रशिक्षण – दि २३/०६/२०१९ – बै. नाथ पै सभागृह, नगरपरिषद, सावंतवाडी – सकाळी १० वाजता
२) कणकवली प्रशिक्षण – दि २३/०६/२०१९ – भगवती मंगल कार्यालय, ता.कणकवली – दुपारी ०२.०० वाजता
३) रत्नागिरी प्रशिक्षण – दि.२४.०६.२०१९ – स्वातंत्रवीर वि दा. सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर रोड, रत्नागिरी – सकाळी १०.०० वाजता
४) गुहागर प्रशिक्षण – दि.२४.०६.२०१९ – श्री पूजा मंगल कार्यालय, मोरका आगर, गुहागर – दुपारी ०२.०० वाजता