प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार जलसंधारण कामांचा शिरगावकरांचा निर्धार
रत्नागिरी दि.22 (जिमाका):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील शिरगाव ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी पावसाचे पाणी अधिकाधिक प्रमाणात मुरवण्याचा प्रयत्न करुन असा निर्धार केला.
शिरगाव येथील ग्रामपंचायत भवनात ही विशेष ग्रामसभा आज झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली गावडे (सनगरे) या होत्या.
या भागात आवश्यक असेल त्या पध्दतीची आणि भौगोलिक क्षेत्रात तग धरु शकतील अशी झाडे लावण्यात यावीत अशी मागणी गावकऱ्यांनी सभेत केली.
कार्यक्रमास उपस्थित जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचे यावेळी समयोचित भाषण झाले. अनेक विभागांचे प्रतिनिधी सभेला अनुपस्थित असल्याबद्दल गावकऱ्यांनी रोष प्रकट केला होता त्यांच्या भावना प्रशासनास कळवे असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या सभेस शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरंपच वैशाली गावडे (सनगरे), जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके, ग्रामपंचायत सदस्या रहिमत काझी, सचीन सनगरे, बाबू शेटये आदि सदस्य तसेच अलीमियाँ काझी, आसावरी शेटये, विलास मयेकर, तुलसीदास शेटये, सतीश पालकर आदि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
००००