
बिग बॉस २ मधील लोकप्रिय कलाकार अभिजित बिचुकले यांना अटक
मुंबई – आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित बिचुकलेला गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून केली अटक.कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धेक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. त्यांना सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आलीय.
आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अभिजित बिचुकले यांना गोरेगाव फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटवरून अटक केली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली असून साताऱ्यात भा. दं. वि. कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल होता असून ३५ हजारांचा चेक बाउंस झाल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांचे पत्र आणि कोर्टाचे नॉन बेलेबल वॉरंट घेऊन सातारा पोलिसांचे पथक आले होते. फिल्म सिटी परिसर आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना मदत केली असून सकाळी अटक करण्यात आली असल्याची माहिती आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांनी दिली.