जिल्हा शासकीय रूग्णालयातील इमारतींच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता, शस्त्रक्रियागृहाला लागली गळती
रत्नागिरी ः शहरात पहिल्याच पावसात जिल्हा शासकीय रूग्णालयातील शस्त्रक्रियागृहामध्ये मोठ्या प्रमाणात स्लॅबमधून गळती होत असल्याने रूग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाचे देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र सार्वजनिक बांधकामच्या भोंगळ कारभाराचा फटका पहिल्याच पावसात रत्नागिरी शासकीय रूग्णालयातील रूग्णांना सोसावा लागला. त्यामुळे रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी रूग्णांकडून केली जात आहे.