कोतवडे सुरू बनात अनधिकृत वृक्षतोड सुरूच, जि.प. माजी उपाध्यक्षांची कारवाईची मागणी
रत्नागिरी ः रत्नागिरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती विद्या गमरे यांच्या आदेशानंतरही कोतवडे सुरुबनातील अनधिकृत वृक्षतोड अद्याप सुरूच आहे. संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरूण पेडणेकर यांनी दिले आहे.
कोतवडे सुरूबनातील अनधिकृत वृक्षतोडीची चौकशी पूर्ण होईपर्यंत तोड थांबविण्याचे आदेश गटविकास अधिकार्यांनी दिले होते. या आदेशाकडे दुर्लक्ष करून सुरुबनातील वृक्षतोड अजूनही सुरू आहे. पर्यावरण रक्षणासाठी शासनाने झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाने जाहीर केलेल्या उपक्रमाविरोधात सुरूबनात तोड सुरू असल्याचे अरूण पेडणेकर यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.