कोकणात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ होण्यासाठी मत्स्यव्यवसायमंत्री सकारात्मक; आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार:- आमदार राजन साळवी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेले रत्नागिरी मधील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय हे नागपूर (माफ्सू) शी संलग्न न करता कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कायम ठेवून येथील विद्यार्थ्यांच्या सन २००० पासूनच्या पदव्या ग्राह्य धरण्याच्या निर्णयानंतर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री मा. ना. महादेव जानकर ह्यांनी कोकणाला स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधिमंडळातील कोकण पक्षप्रतोद व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी ह्यांनी आज राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री मा. ना. महादेव जानकर ह्यांची भेट घेऊन आपल्या अभ्यासपूर्ण स्वभावानुसार त्यांना कोकणाला स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाची गरज कशाप्रकारे आहे त्याचे महत्व पटवून दिले. कोकणाची सर्व पार्श्वभूमी, येथील मत्स्य उत्पादन आणि मत्स्य व्यवसाय ह्याबद्दल आमदार राजन साळवी ह्यांनी अभ्यासपूर्वक माहिती दिल्यानंतर मा. ना. महादेव जानकर ह्यांचे मन वळविण्यात आमदार राजन साळवी यशस्वी झाले असून आता राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री कोकणाला स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ होण्यासाठी सकारात्मक असल्याचे आमदार राजन साळवी ह्यांनी सांगितले. परंतु मा. ना. महादेव जानकर ह्यांचे म्हणण्यानुसार कोकणाला स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ होण्यासाठी आर्थिक तरतुदीची आवश्यकता असून त्यासंदर्भात आपण पुढील आठवड्यात शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे ह्यांचे नेतृत्वाखाली राज्याचे मा. मुख्यमंत्री व मा. अर्थमंत्री ह्यांची भेट घेऊन कोकणाला स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ मिळण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार राजन साळवी ह्यांनी सांगितले. शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख मा. आदित्यजी ठाकरे ह्यांचे नेतृत्वाखाली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे नावाने कोकणाला स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ मिळवून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत असून लवकरच त्यामध्ये यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास आमदार राजन साळवी ह्यांनी बोलून दाखवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button