कार स्फोटात मृत्यू पडलेला युवक चिपळुणातील कारखानदार
मुंबई गोवा महामार्गावर बोरज नजीक धावत्या कारचा स्फोटाने त्यामध्ये होरपळून मृत्यू पावलेला तरुण चिपळून खेर्डी येथील तरुण उद्योजक असल्याचे निष्पन्न झाले आहे.या तरुणाचे नाव सचिन कांबळे असे आहे.मूळचा मुंबई येथील असलेल्या सचिन कांबळे याने आपला भाऊ विजय यांच्यासह खेर्डी औद्योगिक वसाहतीत फरसाण व्यवसाय सुरू केला होता.अल्प कालावधीतच त्यांनी या व्यवसायात मोठी झेप घेतली होती. सध्या त्यांच्या कारखान्यात स्थानिक ६० कामगार काम करीत होते.फरसाणा अन्य बेकरी पदार्थांच्या त्यांचा लघुउद्योग यशस्वी झाला होता. सचिनच्या आईला किरकोळ अपघात झाला होता.त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तिला पाहण्यासाठी सचिन सध्या मुंबई चिपळूण अशी येजा करीत होता.काल मुंबई हुन येत असता हा दुर्दैवी प्रकार घडला सचिनच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन यांच्या गाडीत स्फोट कशामुळे झाला हे मात्र अद्याप कळलेले नाही.