
अपंग महिलेच्या पायावरून एसटीचे चाक गेल्याने महिला गंभीर जखमी
दापोली एसटी बस स्टॅंडमध्ये आश्रयास असलेल्या सुनंदा यादव या अपंग महिलेच्या पायावरून एसटी बस चे चाक गेल्याने ही महिला गंभीर जखमी झाली आहे. काल सायंकाळी दापोलीहून खेडकडे जाणाऱया एसटी बसच्या चाका खाली सुनंदा यादव या महिलेच्या पाय सापडला. आधीच एका पायाने अपंग असलेल्या महिलेचा दुसरा पाय चाकाखाली आल्याने ही महिला गंभीर जखमी झाली. तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.