अन्यायाच्या विरोधात खेर्डीच्या सरपंच जयश्री खतातेंची जिल्हाधिकार्यांकडे धाव
चिपळूण ः खेर्डीच्या सरपंच सौ. जयश्री खताते यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात अखेर जिल्हाधिकार्यांकडे दाद मागितली आहे. याबाबतचा रितसर अर्ज त्यांनी नुकताच सादर केला आहे. त्यामुळे आता खेर्डी सरपंचपदाच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून खेर्डीतील सत्ता संघर्ष विकोपाला गेला आहे. सरपंच सौ. खताते यांच्याविरूद्ध १७ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला आहे.