
वसुल केलेली लाखो रुपयांची रक्कम स्वतःच हडप केली वित्तीय संस्थेच्या वसुली अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी ः कर्जदारांकडून वसूल केलेली रक्कम संस्थेत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून संस्थेची सुमारे १ लाख ९२ हजार ५३० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नितेल नलावडे या वसुली अधिकार्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश रामचंद्र होरंबे (३४, रा. पानवल, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार नितेश नलावडे हा डीएचएफएल या वित्तीय संस्थेत वसुली अधिकारी म्हणून काम करतो. त्याने संस्थेच्या खातेदारांकडून वसुली केलेली सुमारे १ लाख ९२ हजार ५३० रुपयांची रक्कम संस्थेत न भरता आपल्या फायद्यासाठी वापरून संस्थेची फसवणूक केली. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत




