रत्नागिरी जिल्ह्यात लावणार ५४ लाख ७८ हजार वृक्ष
रत्नागिरी ः जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणात होणारे बदल आणि निसर्गाचे बदललेले ऋतुचक्र यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५४ लाख ७८ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
हरित सेना महाराष्ट्रतर्फे प्रत्येक नागरिकाला वन व वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच लोकसहभागातून वन व वन्य जीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्यात यावे यासाठी ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.