
माजी असैनिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एकत्र येण्याची गरज ः सय्यद देशमुख
रत्नागिरी ः प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी एकत्र येणे हीच खरी काळाची गरज असल्याचे मत सय्यद देशमुख यांनी व्यक्त केले.
माजी सैनिक संघटनेची रत्नागिरी जिल्हास्तरीय आढावा बैठक मराठा भवन हॉलमध्ये संपन्न झाली. दापोलीतील माजी सैनिक सय्यद देशमुख सभेच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा संस्थेचे अध्यक्ष सुभाष सावंत, सचिव श्री. शंकरराव मिलके यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शहीद झालेल्या सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आढावा बैठकीच्या कामकाजाला सुरूवात करण्यात आली.