
पत्रकार मारहाण प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट
खेड ः रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांची नुकतीच भाजपा शिष्टमंडळाने भेट घेवून खेड येथील पत्रकार मारहाण संदर्भात जातीने लक्ष घालण्याची मागणी केली.
पत्रकारांना भर बाजारपेठेत दिवसाढवळ्या मारहाण करणे असे प्रकार यापूर्वी केव्हाही घडले नव्हते असे प्रकार निंदनीय असून त्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. अशा प्रकारची गुंड प्रवृत्ती समुळ नष्ट होणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांच्या निदर्शनास आणले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिरगांवकर, प्रभारी शशिकांत चव्हाण, विनोद चाळके, सरचिटणीस जगदीश आंब्रे, चिटणीस योगेश आंब्रे, युवामोर्चा अध्यक्ष राकेश पाटील, सागर दरेकर यांनी चर्चेत भाग घेतला.