
जोरदार पावसाने मोरी खचली
केळंबे (लांजा) ः मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील नव्याने काम केलेली मोरी खचल्याची घटना घडली. पहिल्याच पावसाचा दणका महामार्गाला बसल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाने महामार्गावर मातीचा चिखल पसरला असून उत्खननामुळे खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून हा पहिल्यांदा मोठा पाऊस कोसळला.