
मध्य महाराष्ट्रात येत्या बुधवारी आणि गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत- ढगाळ राहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीने घेतलेली विश्रांती कायम राहील. मध्य महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. ६) आणि गुरुवारी (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली.
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अंशत- ढगाळ हवामान आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात बुधवारी (ता. ६) व गुरुवारी (ता. ७) हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
www.konkantoday.com