एस.टी. महामंडळाचा विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ रत्नागिरीत दाखल
रत्नागिरी ः येत्या काळात एसटी महामंडळ आपल्या सेवेत कमालीचा बदल करणार आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त सुरक्षित व आरामदायी प्रवास करता यावा यासाठी पारंपारिक बांधणीपेक्षा नव्या डिझाईनमध्ये लालपरीची रचना करण्यात येत आहे. एस.टी. महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ रत्नागिरीत दाखल झाला. यानिमित्त एसटीच्या विविध योजना व नव्या युगातील एसटीच्या बदलांविषयी जनजागृती करण्यात आली. मुंबईतील बस फॉर अस फाऊंडेशन या संस्थेचा हा अनोखा उपक्रम आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा चित्ररथ फिरत आहे