
रंगकर्मीची सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक, रंगकर्मीच्या बहुतांशी मागण्या मान्य
अस्वस्थ रंगकर्मीनी क्रांतिदिनाचे औचित्य साधून केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. मंगळवारी निवडक रंगकर्मीची सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक झाली. ज्यामध्ये रंगकर्मीच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या.
करोनाकाळात रंगभूमीला लागलेले टाळे अद्याप उघडले नसल्याने अडचणीत आलेल्या रंगकर्मीनी आपल्या वेदना ९ ऑगस्ट रोजी आंदोलनातून मांडल्या. जवळपास १ हजारहून अधिक रंगकर्मी हिंदमाता येथील दादासाहेब फाळके स्मारकाजवळ जमले होते. सांस्कृतिकमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेत रंगकर्मीना बैठकीचे आमंत्रण दिले होते. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या या बैठकीत करोनाकाळातील आणि कायमस्वरूपी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
www.konkantoday.com