
आरएसएसचे जुने कार्यकर्ते पद्माकर कामेरकर यांचे निधन
रत्नागिरी ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ५० वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले हातखंबा नागपूरपेठ येथील पद्माकर आबा कामेरकर (८१) यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. आरएसएसमध्ये अनेक वर्षे कार्य केल्याने मुंबई, कोकण परिसरात त्यांनी अनेक स्नेही जोडले होते. उद्योजक बाळशेठ जठार, भाई जठार यांचे ते सख्खे मामा होत. पद्माकर कामेरकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे.