विनयभंग करून मुलीला धमकी देणाऱ्या आरोपीला दोन वर्षे कारावास

मुलीचे लैंगिक सतावणूक करणे, चोरटा पाठलाग करणे, बालकांचे लैंगिक अत्याचार या कायद्याद्वारे आरोपी परिमल रॉय याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षे ची शिक्षा ठोठावली. यातील आरोपी परिमल हा काही वर्षांपूर्वी खेड येथे चायनीज गाडीवर कामाला होता .त्यावेळी त्याची ओळख पीडित मुलीच्या वडिलांची झाली होती.त्यानंतर आरोपी खेडमधील काम सोडून मुंबई येथे गेला होता. मुंबई येथे गेल्यानंतर वेगवेगळ्या सार्वजनिक फोनवरून त्याने पीडित मुलीचे वडील व मुलीला फोनवरून धमक्या देण्यास सुरुवात केली. मुलीला पळवून नेऊ असे त्याने सांगितले मुलीने फोन उचलला असता तिच्याबरोबर लज्जास्पद बोलणे केले. याबाबत मुलीच्या वडिलाने पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button