रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील गावे इकोसेन्सिटीव्ह मधुन वगळा ;खा.विनायक राऊत
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावे इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळा अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी एका शिष्टमंडळाने द्वारे बुधवारी केली आज दि. 19 जुन 2019 रोजी खासदार-शिवसेना सचिव श्री.विनायक राऊत यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री ना.श्री.प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे शिष्टमंडळा सोबत भेट घेऊन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इको सेन्सेटिव्ह झोन मधून काही गावे वगळण्यात यावी अशी विनंती केली. या शिष्टमंडळा सोबत श्री.प्रमोद कांबळी, श्री.महादेव पारकर, श्री. अभिजित पारकर व इतर उपस्थित होते.