बालिकेवर अत्याचार प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी ः अभाविपची मागणी
रत्नागिरी ः छत्रपती शिवाजी स्टेडियमवर १ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आले. यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पिडीत बालिकेला पोलीस यंत्रणेने न्याय द्यावा, सर्व दोषींवर कठोर कारवाई न केल्यास अभाविप आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अभाविपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.