प्रस्तावित गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर झाडांची कत्तल
गुहागर ः गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाची गुहागर ते चिपळूण जमिनीची हद्द राष्ट्रीय महामार्ग विभाग व जमीन मालक यांच्यामध्ये निश्चित झालेली नाही, जमीन मालकांना पैसेही मिळालेले नाहीत. रस्त्याच्या कामाची एक इंचही सुरूवात झालेली नसताना शेतकर्यांच्या जमिनीतील झाडे तोडण्याचा अनधिकृत धंदा सुरू असून या झाड तोडीला परवानगी देणार्या अधिकार्यांची चौकशी करण्याची मागणी बाजपाचे प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.