कोकणातील गडकिल्ले जागतिक नकाशावर येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक ः खा. श्रीमंत संभाजीराजे भोसले
लोटे ः रायगडाने जे पाहिले, जे सोसले हे आजच्या पिढीने जाणून घेवून समजून घेणे गरजेचे आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्याबरोबर कोकणचे गड किल्ले जागतिक नकाशावर येण्यासाठी कोकणातील उद्योजकांनी व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन कोल्हापुरचे खासदार श्रीमंत संभाजीराजे भोसले यांनी केले.
लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव, उत्कृष्ट व्यवस्थापक व गुणवंत कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळा उद्योगभवन लोटे येथे पार पडला. यावेळी िविशेष अतिथी म्हणून खा. श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले व कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे उपस्थित होते. त्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देवून सत्कार कण्यात आला.
यावेळी श्रीमंत संभाजीराजे यांचे हस्ते उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून श्रेयस इंटरमिडिएटसचे नझीर सय्यद, लहान उद्योगातून रेणुका टायर्सचे सुनिल टेरवकर, उत्कृष्ट सुरक्षा अधिकारी म्हणून घर्डाचे सुभाष बेडकीहाळ यांचा गौरव करण्यात आला. तर गुणवंत कर्मयोगी म्हणून कन्साई नेरोलॅक पेंटसचे देवेंद्र सुर्वे, रॅलीज इंडियाचे संकेत चाळके, लहान उद्योगातून केन इंडस्ट्रीजचे राजेंद्र मोरे व योजना इंटरमिडिएसचे केतन चव्हाण यांना गौरविण्यात आले