अशोक वैद्य, कौस्तुभ बेंद्रे यांनी राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रीज स्पर्धेत विजय मिळविला
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा ब्रीज असोसिएशन, इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्र्रीज स्पर्धेच्या अ गटातील अंतिम सामन्यात पुण्यातील अशोक वैद्य, कौस्तुभ बेंद्रे या जोडीने ६१ गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले.
पुण्यातील भोसले -गोळे जोडीने ३८ गुण मिळवून द्वितीय, मुंबईच्या डॉ. व्हालिया दिवाणजी जोडीने ३५ गुण मिळवून तृतीय, रत्नागिरीतील डॉ. रघुवीर भिडे, अभय लेले जोडीने २१ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकावला. ब गटात मुंबईच्या सुहास विचारे, गोटलकर जोडीने प्रथम, रत्नागिरीतल मोहन दामले, अभय पटवर्धन जोडीने द्वितीय, डोंबिवलीतील देशपांडे जोडीने तृतीय, मुंबईतील दास, मेहता जोडीने चौथा क्रमांक पटकावला. इंडियन ऑईल कंपनीच्या स्मिता गोलविलकर, सुरभी लेले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.