पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नाबरोबरच तोडगा काढणार ः माधव भंडारी
रत्नागिरी ः कोयना धरण पुनर्वसनाबाबत सातारा, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांची लवकरात लवकर बैठक घैतली जाईल. सदर बैठकीतून प्रलंबित प्रश्नांबाबतचा योग्य तो तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितले.
शासनाने भूसंपादन केलेल्या प्रकरणात प्रकल्पांमधील पुनर्वसनासाठी शासन कटीबद्ध आहे. या पुनर्वसनात गावठाणचे स्थलांतर होणे निश्चित झाले आहे. त्याबाबत स्थानिक सुविधांची कामे पूर्ण झाली असल्यास ती त्वरित जि.प.कडे हस्तांतरित करावीत. सदरची कामे जि.प.ने तात्काळ ताब्यात घ्यावीत अशी सूचना माधव भंडारी यांनी केली आहे.