पावसाळा आला तरी मृदा आरोग्य तपासणीची प्रमाणपत्रांचा पत्ता नाही, कृषि अधिकार्यांची दिरंगाई, शेतकरी नाराज
राजापूर ः राज्य शासनाच्या योजनेमधून राजापूर तालुक्यातील २३७ गावांची व काही शेतकर्यांच्या जमिनींमधील मातीची तपासणी करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरापासून या शेतकर्यांना मृदा आरोग्य तपासणी प्रमाणपत्र मिळालेले नाही. काही दिवसांपूर्वीच तालुका कृषि कार्यालयात ही प्रमाणपत्रे आलेली आहेत. मात्र त्याच्या वितरणाचे कष्ट घेण्यास कृषि कार्यालयातील अधिकारी चालढकल करीत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
जून महिना अर्धा होत आला आणि मान्सून यथावकाश सक्रिय होत असला तरी कृषि कार्यालय आणि त्यातील अधिकारी मात्र अजूनही ढिम्मच आहेत. राजापूर तालुका कृषि कार्यालयाच्या बाबतीत तालुक्यातील शेतकर्यांच्या नेहमीच तक्रारी आहेत.