ऑनलाईनवरून खरेदी करणार्‍याची ७० हजारांची फसवणूक

खेड ः ओएलएक्स या ऑनलाईन साईटद्वारे दुचाकी खरेदीसाठी केलेल्या व्यवहारात ६७ हजार १५० रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात करण्यात आली. संकेत सुदेश जाधव (कुळवंडी-पिंपळवाडी) असे फसवणूक झालेल्या ग्र्राहकाचे नाव आहे.
संकेत याने १३ जून रोजी ओएलएक्स या साईटवर सर्च करून केटीएम कंपनीची दुचााकी पसंत पडल्याने त्याने संबंधित मालकाशी मोबाईलवरून संपर्क साधला. मालकाने ही दुचाकी विकायची असल्याचा टेक्स मेसेज संकेत यांना व्हॉटसऍपच्या माध्यमातून पाठवला. त्यानंतर दुचाकी मालकाने गाडीची किंमत ५२ हजार रुपये असल्याचे सांगून बँक खाते पाठवून दिले. त्यानुसार संकेत याने बँक ऑफ इंडिया शाखा तिसंगी व पेटीएमद्वारे चार ते पाच वेळा पैसे मालकाच्या खात्यात पाठवले. मात्र मालकाची या ना त्या कारणाने पैशाची मागणी वाढत जाऊन संकेतने तोपर्यंत ६९ हजार १५० रु. पाठवले. पुन्हा २० हजाराची मागणी केल्याने संकेतने ती रक्कम भरण्याचे टाळले. संबंधित मालकाकडून अद्याप दुचाकी प्राप्त न झाल्याने या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे कळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button