
आंबेनळी अपघातग्रस्तांच्या वारसांना विद्यापीठाच्या सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार आ. संजय केळकर
दापोली ः आंबेनळी अपघातग्रस्त कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा धोरणानुसार कोकण कृषि विद्यापीठाच्या सेवेत घ्यावे यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. त्याला गती मिळालेली नसल्याने आपण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिली.
२८ जुलै रोजी आंबेनळी घाटात विद्यापीठाची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहलीला गेलेले विद्यापीठाचे कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. त्यांच्या वारसांना नोकरीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.



