सार्वजनिक बांधकाम विभागाने केला जिओच्या विरोधात गुन्हा दाखल
गुहागर तालुक्यातील रस्त्याच्या साईडपट्टीचे कोणतीही परवानगी न घेता खोदकाम करून नुकसान केल्याप्रकरणी जिओ कंपनीच्या सुपरवायझरच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे .गुहागर तालुक्यातील प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर जीओ कंपनीच्या वतीने केबल टाकणे चे काम सुरू आहे यासाठी साइडपट्टी खोदून त्यामध्ये चर मारण्यात येत आहेत मात्र हे चार पाडण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही असे बेकायदेशीर खोदकाम केल्याने प्रवासी वाहनचालकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्याची खोदाई करून नुकसान केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जिओ कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.