सहा लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कर्नाटकात अटक
घर देण्याचे आमिष दाखवून ६लाखरुपये घेऊन फरारी झालेल्या आरोपीला कर्नाटक हुबळीतून पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी अस्लम बंदार राहणार लाटवणरियाने यातील फिर्यादी हसीना वलेलेयांच्या पतीला घर घेण्याबाबतचे कागदपत्र तयार करून देतो यासाठी ६ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून द्यावेत असे सांगितले. जे घर विकायचे आहे तेथे मालक हॉटेलमध्ये थांबले आहेत असे सांगून फिर्यादीकडून पैसे घेऊन गेले मात्र प्रत्यक्षात कोणताही व्यवहार न करता आरोपी पैसे घेऊन फरार झाला होता. प्रकार दापोली येथे घडला होता याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता सदरचा आरोपी कर्नाटक हुबळी येथे असल्याचे पोलिसांना कळाल्यावर पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीला अटक केले.