
वटपौर्णिमेला बायकोसाठी पुरूषांचे वडाला फेरे, कुडाळमधील अनोखी प्रथा
कुडाळ ः वटपौर्णिमेचे औचित्य साधून जन्मोजन्मी हीच बायको मिळावी यासाठी पुरूषांनी फेरे घालून लक्ष वेधून घेतले. गेल्या आठ वर्षापासून ही अनोखी प्रथा कुडाळमध्ये सुरू झाली.
वटपौर्णिमेला पतीसाठी पत्नी उपवास करते आणि वडाच्या झाडाला फेरे घालून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी मनोकामना करते. ही भावना लक्षात घेवून काही पुरूषांनीही तिच्यासाठी फेरे घालण्यास सुरूवात केली. गेली आठ वर्षे अखंडपणे ही प्रथा कुडाळ शहर परिसरात पुरूषांनी इमानेइतबारे जपली आहे आणि याकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. बॅरिस्टर नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गवाणकर यांनी ही प्रथा सुरू केली. त्यांना वर्षानुवर्षे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि अनोखी प्रथा चर्चेचा विषय ठरत आहे.