
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरच्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांचा आज देशव्यापी संप, रत्नागिरीतील रूग्णालये बंद
रत्नागिरी ः पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रूग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल्स असोसिएशन (आयएमए) ने आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. आयएमएच्या या आदेशानुसार रत्नागिरीतील डॉक्टर्सही सोमवारी एक दिवसाचा बंद पाळतील अशी माहिती आयएमएचे येथील एक पदाधिकारी डॉ. नाफडे यांनी पत्रकारांना दिली.
या संपामुळे सोमवारी देशभरात वैद्यकीय सेवा ठप्प होणार आहे. केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवाच दिली जाईल. नवीन पेशंटस् तपासले जाणार नाहीत तसेच सिटीस्कॅन, सोनोग्राफी सेंटर, एक्सरे सेंटर्स बंद राहतील. त्याचप्रमाणे पूर्वी ठरलेल्या शस्त्रक्रियादेखील होणार नाहीत. ओपीडी (बाह्य रूग्ण विभाग) बंद राहतील. केवळ आणि केवळ इमर्जन्सी पेशंटस्नाच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती आयएमएच्यावतीने देण्यात आली. देशभरातील डॉक्टरांनी पुकारलेल्या या एकदिवसीय संपामध्ये रत्नागिरीतील आयएमएचे डॉक्टर्स सहभागी होणार आहेत.