राज्य मंत्रीमंडळ विस्तारामध्ये १३ नव्या मंत्र्यांना संधी
राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आज झाला.यामध्ये तेरा नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून.भारतीय जनता पार्टीचे दहा मंत्री ,शिवसेनेचे दोन मंत्री ,रिपाइंचा एक मंत्री.शपथविधी सोहळ्यातील काही महत्त्वाचे मुद्दे .
फडणवीस सरकारमध्ये १३ नव्या मंत्र्यांचा समावेश; शपथविधी सोहळा संपन्न
* औरंगाबद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रिपदाची शपथ
* डॉ. परिणय फुके यांना राज्यमंत्रिपदाची शपथ
* शिवसेनेच्या संजय भेगडे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
* राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शपथविधीनंतर लोणी, राहता आणि शिर्डीत विखे समर्थकांकडून फटाके फोडून आनंद साजरा
* रिपाईच्या अविनाश महातेकर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
* योगेश सागर यांना राज्यमंत्रिपदाची शपथ
* शिवसेनेच्या तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
* डॉ. अशोक उईके यांना मंत्रिपदाची शपथ
* भाजपच्या अनिल बोंडे यांना मंत्रिपदाची शपथ
* सांगलीतील डॉ. सुरेश खाडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
* फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात १३ नव्या चेहऱ्यांचा समावेश
* डॉ. संजय कुटे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
* भाजपच्या आशिष शेलार या्ंनी घेतली मंत्रिपदाची शपथ
* जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
* राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल
* राजेश क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती.