मुंबई गोवा मार्गावर बस, इनोव्हा, टाटा मॅजिक मध्ये अपघात
मुंबई गोवा महामार्गावरील पाक बौद्धवाडी येथे शनिवारी सकाळी ८.१५ वाजता बस, इनोव्हा व टाटा मॅजिक असा तिहेरी अपघात झाला यामध्ये टाटा मॅजिक मधील पाच जण जखमी झाले आहेत.
रुपेश रमाकांत पडयाळ(२७) ,विनायक शंकर कदम (५५), विद्या विनायक कदम (५५),तुषार विनायक कदम (२५),चंद्रभागा मारुती शिर्के (७०) अशी जखमींची नावे आहेत .