अनेक महिन्यांपासून प्रलंबित शहरातील विजेचे खांब  हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

चिपळूण शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब व रुंदीकरणाला अडचण करणारे विद्युत खांब हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.शनिवारी अर्बन बँक बायपास रस्त्यावरील तीन वीज काम हटवण्यात आले.तसेच लवकरच याच आवारातील पाच विद्युत रोहित हटवले जाणार आहेत.दरम्यान या कामानिमित्त बाजारपेठेतील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.शहरातील स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले.या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले असल्याने पूर्वी या रस्तालगत असलेले वीज खांब आता रस्त्याच्या मधोमध उभे आहेत .याच पद्धतीने रंगोबा साबळे मार्गावर ग्रीन पार्क हॉटेलपासून नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यांवरही वीज काम मध्येच असल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे.याशिवाय शहरात अनेक ठिकाणी रस्ता लगत असलेले वीज काम वाहतूकदारांना नाही तितकेच त्रासदायक ठरत आहेत.त्यामुळे हे काम हटवण्याची मागणी नगरपरिषदेने केली आहे .एवढेच नव्हे तर या कामासाठी नगर परिषदेने महावितरण कंपनीकडे सुमारे १ कोटी ८० लाख रुपये जमा केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button