शिवसेनेच्या लोकसभेच्या गटनेतेपदी विनायक राऊत

रत्नागिरी ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांची लोकसभेच्या गटनेतेपदी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्यावतीने त्यांना संधी देण्यात आली आहे. खा. राऊत यांची निवड करण्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र पाठवून शिफारस केली आहे.
खा. राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून तब्बल दोन वेळा निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बालेकिल्ला होता. त्यांचेच सुपुत्र माजी खा. निलेश राणे यांना दोनवेळा खा. राऊत यांनी पराभूत केले. अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले व पक्षसंघटना वाढवली. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना गटनेतेपदी संधी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button