फिनोलेक्स ऍकॅडमीत सेतु सुविधा केंद्र सुरू

रत्नागिरी ः फिनोलेक्स ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन, गुणपत्रक, प्रमाणपत्र पडताळणी, गुणपत्रके अद्ययावत करणे, सल्लामसलत, प्रवेशासंबंधीच्या समस्येबाबत शंका निरसन आदी सेवा केंद्रात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
अभियांत्रिकी, फार्मसी, एमसीए, एमबीए, एमएमएस, एलएलबी, कृषि, वैद्यकीय, आर्किटेक्चर, फिशरीज, बी.एड., बी.पी.एड., बी.एफ.ए., एचएमसीटी आदी व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया करता येते. यासाठी ुुु.ारहर२०१९लरि.ेीस या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
सध्या प्रवेश प्रक्रियेसाठीची नोंदणी, डाक्युमेंट अपलोडींगची सुविधा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांची सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऍकॅडमीच्या केंद्रात आणावीत. प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक असणार्‍या प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी पीडीएफमध्ये असावी. त्याची साईज २५० केबीपेक्षा कमी असावी. फोटो, सही, जेपीजी/जेपीईजीमध्ये असावी. त्याची साईज ५० केबीपेक्षा कमी असावी. इच्छूक विद्यार्थ्यांनी फिनोलेक्स ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड टेक्नॉलॉजी, प्लॉट नं. ६०, ६१/१, एमआयडीसी मिरजोळे ब्लॉक रत्नागिरी-४१५६३९ असा महाविद्यालयाचा पत्ता आहे. अधिक क्रमांकासाठी ९४२२६१८७०८, ८६०५१५४६०७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button