जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी स्वतंत्र लेखाधिकार्‍याची नियुक्ती

रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढावे यासाठी श्री. शिंदे यांची स्वतंत्र लेखाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठीच्या जमीन व्यवहारातून मुद्रांक शुल्कापोटी जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. स्वरूपा साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पन्न वाढीची विशेष बैठक संपन्न झाली. उपाध्यक्ष संतोष गोवळे, सभापती विनोद झगडे, सहदेव बेटकर, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. आंचल गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button