जन्मदात्या आईचा मुलाने केला खून

लांजा ः पत्नीबरोबर भांडण करणार्‍या जन्मदात्या आईची हत्या क्रुरकर्म्या मजहर हमी काळसेकर यानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजारात घेवून जाण्याच्या बहाण्याने गोळवशी येथे डोक्यात दगड घालून मजरने आईची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात तडफडणार्‍या आईला तेथेच टाकून नजिकच्या भागातून पेंढा आणून आईचा मृतदेह पेटवून दिला. या नराधम पुत्राच्या कृत्याने लांजा तालुका हादरला आहे. मजरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी २४ तासात आरोपीला जेरबंद केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button