साटवलीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला
लांजा ः लांजा तालुक्यातील साटवली येथून बेपत्ता झालेल्या फातिमा हमीद काळसेकर (६१) यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर त्यांचा मृतेदेह जाळून टाकण्यात आला. ही घटना उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या अर्धवट जळालेल्या साडीवरून पतीने मृतदेह ओळखला आहे. महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याने जवळच्या व्यक्तीने त्यांची हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. रात्री उशीरा पोलिसांनी जवळच्याच दोन नातेवाईकांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी उशीरापर्यंत सुरू होती.