पोफळी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला ९ जणांचा चावा

चिपळूण ः चिपळूण तालुक्यातील पोफळी पंचायत समिती गणातील ९ जणांना दोन दिवसात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत घायाळ केले. त्यामुळे जखमी रूग्णावर शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
शिरगांव परिसरात गेले दोन दिवसात एका पिसाळलेल्या कुत्र्याने ९ जणांना चावा घेवून जखमी केले. यामध्ये शिरगांव येथील प्रशांत प्रकाश पवार, पोफळीतील अब्दुल्ला महामुद खान, कुंभार्लीतील ओंकार प्रकाश घाग, चिपळूणमधील पांडुरंग मारूती पवार, पोफळीतील सुर्यकांत गणपत साळुंखे, कोंडफनसवणेतील अर्जुन दत्ताराम जिनगरे, दिलीप पांडुरंग जाधव, राजेंद्र कृष्णा शिगवण यांना कुत्र्याने चावा घेवून जखमी केले. त्यांच्यावर शिरगाव येथील प्रा. आ. केंद्रात उपचार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button