जिल्ह्यातील ४३ ठिकाणचे पाणी नमुने दुषित
रत्नागिरी ः जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दर महिन्याला पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. मे महिन्यात पावसाळापूर्व घेण्यात आलेल्या तपासणीत १५६५ नमुन्यांपैकी ४३ ठिकाणचे पाणी नमुने दुषित आढळले आहेत. टीसीएल पावडरचा वापर करून हे पाणी शुद्ध करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात ४०८, दापोलीतील ८७५, खेड १००३, गुहागर ७७३, चिपळूण १२३९, संगमेश्वर ९७३, रत्नागिरी ७५६, लांजा ७०६ आणि राजापूर तालुक्यात १०५५ असे जिल्ह्यात ७ हजार ७८८ पाण्याचे स्त्रोत आहेत. यातील काही पाण्याचे नमुने दर महिन्याला प्रयोग शाळेत तपासले जातात.